तीन चारोळ्या -

१.
जीवनवस्त्र -

चार सुखाचे धागे तुझे
चार दुःखाचे धागे माझे -
जीवनवस्त्र विणत हे राहू
सारत चिँता संसारी ओझे ..
.


२.
कालाय तस्मै नम:

गोंडा घोळत होतो मी 
एकेकाळी जिच्याभोवती -
पिंगा घालत असते ती
आता माझ्या अवतीभवती ..
.


३.
सार्थक


आम्रतरूखाली मी बसलो
सावलीत अती समाधानाने-
सार्थक वाटुन अस्तित्वाचे
हलल्या फांद्याही आनंदाने ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा