हपीसातून घरी आलो...
माझा हसरा चेहरा पाहून,
बायकोने विचारले,
" काय मिष्टर, आज काहीतरी विशेष घडलय वाटतं ऑफिसात ?
बढती वगैरे ? "
मी आनंदाने उत्तरलो,
"अग, किती मनकवडी आहेस तू !
मला पदोन्नती मिळाली - ती पण ...
माझ्या बहिरेपणामुळे !"
बायकोने आश्चर्याने विचारले,
" बहिरेपणामुळे .. नीट सांगाल का जरा ? "
मी उत्तरलो, " हो हो. बहिरेपणामुळे !
मला 'खास-वरिष्ठ-लेखनिक' म्हणून नेमण्यात आले आहे...
'" तक्रार विभागा'"त !"
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा