काय तर म्हणे २५ वर्षे सुखाने संसार केला !
कसं शक्य आहे ?
कधी विनाकारण भांडलात ..... ?
मुळीच नाही .
कधी रुसलात दोघापैकी कुणीतरी एक ....?
कधीच नाही .
कधी बिन मिठाची भाजी ताटात पडली तुमच्या ....?
अजिबात नाही .
कधी चित्रपटाला उशिरा गेलात ....?
मुळीच नाही .
दूरदर्शनच्या रिमोटवरून भांडलात .... ?
कधीच नाही .
तुझी सासू माझी सासू -
या विषयावर वाद घातला .....?
अजिबात नाही .
आणि तरीही भलतेच धाडस करून म्हणता ?
" २५ वर्षे आम्ही सुखाने संसार केला ! "
सुखाचा म्हणजे .......
नक्की कसा संसार केला हो ?
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा