'कविता' म्हणजे काय वेगळे


खोल दरीतले वाहते पाणी
उंच डोंगरावर पक्षी प्राणी


कानावर घोंघावणारे वादळ
नितळ दिसणारा सागरतळ


फांदीवर हळूच फूल डुलणारे
वाऱ्यावरून पान तरंगणारे


नभात चांदणी चमचमणारी
सागरात बोट हेलकावणारी


झाडावरून खार तुरुतरुणारी
रोपट्यावर कळी मोहावणारी


सशाचा डोळा लुकलुकणारा
वाळूतला शिंपला चमकणारा


कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे
एका झुरळाचे सहस्र डोळे


शब्दात रंगवणे हेच सगळे
"कविता" म्हणजे काय वेगळे ..!

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा