फेसबुकाध्याय

सकाळी सकाळी प्रसन्न हसावे 
पुढ्यात बसावे संगणकाच्या ..

घालोनी "फेसबुका"त निजफेस 
"लॉगिन" फेसबुकी आधी करावे ..

"इमेल" "जीमेल" सवडीने पहावे 
"फीमेल फेसा"स आधी निरखावे ..

"रिक्वेस्ट" फ्रेंड-फ्रेंडणीच्या पहाव्या 
डिलीट सत्वरी "फ्रेंड"च्या कराव्या ..

"मेसेज" कुणाकुणाचे ते पहावे 
गरजेनुसार वर्गवारी उघडावे ..

जमेल तेवढे फोटो-काव्य अपुले
नको तिथेही "ट्याग" ते करावे ..

"लाईक" "कॉमेंट" शेअर आधी 
मैत्रिणींच्या "पोस्ट"ला नक्की करावे ..

जमल्यास इतरांच्या वाचोनी पोस्ट
वाटल्यास कॉमेंट लाईक करावे ..

"कॉपीपेस्ट" इतरांचे करावे स्टेटस 
स्वनामे निजभिंतीवरी "अपडेटावे" ..

उघडकीस आले जरी कॉपीपेस्ट 
"सॉरी" म्हणूनी मोकळेच व्हावे ..

लाईक अपुल्या "स्टेटस"वर पहावे 
नसले तरी, ना नाराज व्हावे ..

कॉमेंट करावी दणकून तेथे 
कळेना कुणाला स्टेटस जेथे ..

वादात नित्य आपणही असावे 
शिवी-ओवीने सार्थक करावे ..

स्टेटस अपुले कसलेही लिहावे 
इतरांचे बकवास समजून घ्यावे ..

लाईक इतरांस कमीच द्यावे 
स्वत:स नेहमी अपेक्षित रहावे ..

सर्वात श्रेष्ठ स्वत:सी पुजावे 
इतरांस तुच्छ समजोनी जावे !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा