रक्षाबंधन... रक्षाबंधन
दोन मनांची अतूट गुंफण ! ..१
हिरा भाऊ अन् बहीण अंगठी
अंगठीस हो सुरेख कोंदण ! ..२
मदतीस्तव वा संकटातही
धावे बंधू करण्या रक्षण ! ..३
भावाचा बहिणीस आधार
द्रौपदीसखा तो नारायण ! ..४
दुजाभाव ना मनांत कोठे
दोघांचे ते एकच रिंगण ! ..५
रक्षाबंधन ... रक्षाबंधन
दोन जिवांचे अतूट बंधन ! ..६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा