सवय आणि सेवानिवृत्ती


 सेवानिवृत्तीच्या तिसऱ्या दिवशी....  दुपारी एक-दोनची वेळ !
 

बायकोने आतून आवाज दिला,
" अहो, ऐकल का ? "

बाहेरून मी उद्गारलो,
" ओरडू नकोस ! झोपलो नाही, जागाच आहे मी ! "

... स्वैपाकघरातून दिवाणखान्यात येत,
बायको डोळे विस्फारून माझ्याकडे पहात उद्गारली-
" अग्गो बाई, आश्चर्यच आहे ! जागेच आहात का तुम्ही ?  मला तर वाटलं-
 आता दुपारी शांतपणे  ढाराढूर झोपला असाल, तुम्ही घरीच बसून ! "

सुस्कारा टाकत, मी म्हणालो,
" अग, परवा सेवानिवृत्त झाल्यापासूनच तर.....
माझी " दहा ते सहा " ह्या वेळेत  झोपायची सवय पूर्ण मोडावी लागणार !
काय करावे समजतच नाही ! "
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा