बदल


पक्षी व्हावे झुलत रहावे
या फांदीवर त्या फांदीवर
फळास टोचत स्वैर फिरावे
या झाडावर त्या झाडावर . .

टकमक टकमक बघत रहावे
विस्मित होऊन डोळे भरून
सरसर सरसर पळत पहावे
नवीन जग जमिनीवर फिरून . .

तेच तेच ते जीवन जगणे
रोजचेच झाले रडगाणे
आयुष्यभराचे नीरस जगणे
त्याला कवटाळून रहाणे . .

नाविन्याचा ध्यास धरावा
उबग जुनाटपणाचा यावा
वाटत नाही कधी असे तर
जीवनत्याग खुशाल करावा . .
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा