हे कुठवर चालणार, देवा -


जगणारे जगताहेत जमिनीवर
मस्त मजेत खुशालचेंडूसारखे
मरणारे मरताहेत अधांतरी
नशिबाला कोसत किड्या-मुंगीसारखे

प्रयत्न करणाऱ्याच्या भाळावर
कायम लिहिलेले दिसते अपयश
माशा मारणाऱ्या आळश्यामागे
नेहमी जोरात धावत येते यश

बाबा बापू रासलीलेत गुंगून
भाविकाला झुलवत असतात
त्यांच्या नादी सर्वस्व विकून
भिकेचे डोहाळे हतबल जपतात

असेच रडत कुढत जीवन
दिवस ढकलतात काहीजण
पैसा म्हणजेच आहे जीवन
नात्याचा जीव घेतात काहीजण

पाय हलवायलाही जागा नाही
टीचभर घरात कुण्या गरिबाला
एका इमल्यावर आणखी किती
विचार करत घोर पडतो रावाला

राव-रंकाची माणसा-माणसाची
दिनचर्या बघतो "तो" नुसती वरून
आपल्याला काय त्याचे म्हणत
निराकार "तो" घेतो डोळे मिटून !


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा