आड .. विहीर ..


एक सीमारेषा येते

विवाहिताच्या आयुष्यात

एकीकडे आई

दुसरीकडे पत्नी

संभ्रम सुरू होतो

कुणाच्या मायेवर

कुणाच्या दयेवर

आपले अस्तित्व

गैरसमजाचे घेरे

संशयाचे फेरे

द्विधा मनस्थिती

सीमारेषा दोलायमान

उरते अस्तित्वहीन

जगणे- एक लोढणे . .
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा