सोबत


त्या दिवशी
तू खाऊ घातलेले चहापोहे
सोबत तुझे निर्मळ हास्य

त्या दिवशी
तुझी झुकलेली नजर
सोबत तुझा पदराशी चाळा

त्या दिवशी
तुझी ती एकच नजर
सोबत तुझा तो होकार

त्या दिवशी
तुझा दारातला निरोप
सोबत माझ्यावरचा विश्वास

त्या दिवशी
मनात केलेला निश्चय
सोबत यापुढे तुझीच सोबत -

इतक्या वर्षांनी
आठवतोय तोच दिवस
ती चव तो निरोप

सोबत..
हवीशी वाटणारी
आताही असणारी


सोबत
ही तुझीच
युगांतापर्यंत लाभणारी . .
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा