कधी वाटते -


कधी वाटते मोबाईल व्हावे
तिच्या मऊ मुठीत गच्च मिटावे

कधी वाटते छत्री व्हावे
तिच्या नाजूक हाताशी चाळे करावे

कधी वाटते पर्स व्हावे
तिच्या खांद्यावरुन मस्त हिंदकाळावे

कधी वाटते रबरब्यांड व्हावे
तिच्या केशकलापात गुंतून जावे

कधी वाटते गॉगल व्हावे
तिच्या डोळ्यात पहात राहावे

कधी वाटते.... नुसतेच काय वाटावे
सत्यातही कधीतरी तसे घडावे . .
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा