'कविता' म्हणजे काय असते...


'कविता' 'कविता'
म्हणजे काय असते...


हृदयातून फुटलेले
शब्दांचे कारंजे असते...


विचारांनी खुललेले
लोभस इंद्रधनू असते...


शब्दांच्या पसरणीतले
रांगोळीचे अंगण असते...


आईने शांत गायलेले
सुरेल अंगाईगीत असते...


बाळमुठीत दडलेले
अद्भुतरम्य गुपित असते...


प्रेयसीगाली फुललेले
गुलाबाचे फूल असते...


प्रियकराच्या स्पर्शातले
रोमांचित स्वप्न असते...


एकमेकांत कुजबुजलेले
प्रेमाचे हितगुज असते !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा