काय अर्पण्यास भेटू देवळात ..


सुखाऐवजी दु:ख 
टाकसी पदरात 
ठिगळे जोडतो 
साठवण्या त्यात ..

नको दु:ख इतकी 
देऊ मला देवा 
ओझे पेलण्याचे 
बळ ना तनात ..

चाखवसी बोट 
सुखाचे कधीमधी 
आस पुनर्जन्माची 
जागते मनात ..

चिंता उरली देही 
चिता रचू कैसी 
ओझे सरणासी 
व्यथा जाळण्यात ..

भोग घरीदारी 
रिक्तहस्त झाले 
काय अर्पण्यास 
भेटू देवळात ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा