जन्म कवितेचा

अवचित येई 
 मनांत माझ्या
कधीतरी
प्रतिभा बहरुनी ..

सुखदु:खाच्या
रम्य कल्पना
पिंगा घालती
विचारातुनी ..

विचारऊर्मी
उचंबळूनी
पडती बाहेर 
मनातुनी   ..

शब्दांनाही
फुटतसे कोंब
अलवार हृदयी
 कल्पनेतुनी  ..

बघता बघता
छानशी कविता
 जन्मा येते
लेखणीतुनी .. 

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा