खबरदारी


क्षुल्लक कारणावरून 

तुला असे 
मुळूमुळू रडतांना पाहून,

मी थोडातरी विरघळेन, 
असे वाटले असेल तुला -

माझ्या य:कश्चित जिवासाठी
तू अनमोल अश्रू ढाळतेस...

माझ्या रुक्ष चेहऱ्यावर
तू जाऊ नकोस -

माझ्या कठोर काळजातही 

तुझ्या आसवांचे मोती 
जपून साठवताना -

माझी किती तारांबळ
जिवाची घालमेल होतेय ...

तुला तीच न दिसण्याची 
खबरदारी घेत आहे मी !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा