एक तुझा चेहरा

एक तुझा चेहरा 
शीतल चांदणे चहुकडे..

एक तुझा कटाक्ष 
सुगंधाचा शिडकावा..

एक तुझा मुरका 
दिलाला चटका..

एक तुझा 'अय्या'
घ्यायाळ जीवन..

एक तुझा 'इश्श'
जीव माझा हैराण ..

एक तुझा राग  
परवडले चंद्रपूरचे ऊन.. !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा