सारखे दुष्काळ दौरे पाहण्याला काढले.. [गझल]

सारखे दुष्काळ दौरे पाहण्याला काढले
बघ जरा रे डोळसा तू अश्रु नयनी साठले 

शेत सगळे भिजवले का आपल्या त्या अश्रुनी
पीक गरिबीचेच म्हणुनी त्यातुनी मग उगवले

दचकतो का शेतकर्ता बघुन स्वप्नी पावसा 
सत्य कटु हे जाग असता पावसाने टाळले 

आत्महत्या शेवटाला घोर चिंता जीवनी    
रोज भीतीनेच मरता जीव जगणे विसरले 

रोज विझवू शेतवणवे वाटले जरि त्या मना  
पाहुनी दुष्काळ भीषण अश्रुही का आटले ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा