आली आली दिवाळीराणी .

ठसठशीत रुळते बिंदी भाळी बुंदीची
झोकदार ठसते नाकी नथ करंजीची

मंगलसूत्री पदक छानसे बेसनलाडू जणू
सुंदर बाजूबंद मोत्याचे रवालाडूस म्हणू

नयनी सुरेख झलक जाणवे जिलब्यांची
डौलात डूल डुलती कानी शंकरपाळ्यांची

हाती चमकत्या चकल्या चक्राकार कंकणे
खारीबुंदीची आकर्षक पायी पैंजणे

शेवपाटल्या सोनेरी दिसती मनगटी
चिरोटेमेखला शोभते सुंदरशी कटी

चंद्रहार झगमगे गळाभरून चिवड्याचा
गजरा माळला कसा पिवळा मोतीचुराचा

बोटात अंगठी नाजूकशी कडबोळ्याची
टिकली शोभिवंत कपाळी अनारशाची

साजशृंगार करुनी आनंदे हसवत मनी
आली आली दिवाळीराणी पहा नटुनीथटुनी .. !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा