इमारती त्या उंच उंच पण - [गझल]

मात्रावृत्त-
मात्रा- १६+१२
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
इमारती त्या उंच उंच पण नाही कसली हिरवळ नसे तिथे का एक पाखरू नाही मनही निर्मळ .. न थेंब पाणी त्या नळातुनी डोळ्यांवाटे येते किती किती ती चालते सदा पाण्यापायी चळवळ .. चुकार हम्मा वाट शोधते येते गेटामधुनी तिला जलाचा थेंब ना मिळे पाठी मारच केवळ .. निघे कधी तो घोळका पुढे हंडा घागर डोई कुणास नसतो ताळमेळ मग नुसती माजे खळबळ .. विहीर नाही आडही नसे धावाधावच नुसती करा पुकारा शंख ठोकुनी स्त्री पुरुषांची वळवळ .. खुशाल डोंगर फोडणार अन झाडे तोडुन गायब न पावसाच्या स्वागतास ती ना उत्साही दरवळ .. निसर्ग पाही आपल्यावरी घाला मानव घाली जशास तैसे वागणार तो कुठली हृदयी तळमळ .. .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा