रस्त्यामध्ये खड्डे गडे -

[मूळ रचना- आनंदी आनंद गडे ...]

रस्त्यामध्ये खड्डे गडे, 
इकडे तिकडे चोहीकडे ..

इथे तिथे खणलेत असे
तुजसंगे मी चालू कसे 
हात मी धरला, बूट घसरला, चिखल पसरला 
मी इकडे अन तू तिकडे ..

नवीन कपडे घालावे 
ठरवले, मी मिरवावे 
रस्त्यावरूनी प्रेमाने 
आनंदे उत्साहाने 
स्वप्न भंगले, कपडे रंगले, खड्डे न चुकले
इकडे तिकडे चोहीकडे ..
.

[सप्तरंग- सकाळ रविवार, २० सप्टेंबर २००९]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा