आदर्श खास "गुरुजी".....(गझल)

आदर्श खास "गुरुजी" संस्कार होत गेला
सन्मार्ग चालण्याला आधार होत गेला..
.
लाडात वाढलेला संस्कारशून्य ठोंब्या
जाहीर पालकांचा उद्धार होत गेला..
.
वारीत दंग झालो तालात नामघोषी
डोळ्यापुढे विठूही साकार होत गेला..
.
संवाद साधताना तडजोड मीच केली
तेव्हा जरा सुखाचा संसार होत गेला..
.
वर्षाव देणग्यांचा मोहात दानपेट्या
भक्तात दर्शनाचा बाजार होत गेला..
.
पाहून तोडणारे नियमास नित्य येथे
नियमास पाळणारा बेजार होत गेला..
.
मासा गळास बघुनी नेता मिशीत हसला 
हातात नोट हर्षित मतदार होत गेला..
.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा