निरनिराळ्या स्पर्धा .....!


निरनिराळ्या स्पर्धा भरवायच्या आहेत !

खास पाकिस्तानचे खेळाडू , गायक , नर्तक , वादक , साहित्यिक ...
थोडक्यात निदान ६४ कलात पारंगत असणाऱ्या, 

तेथील कलाकारासाठी स्पर्धा भरवायच्या आहेत ! 
इतर कलातही ते वाकबगार आहेत, हे जगजाहीर आहेच.

स्थळ : अर्थात भारत !

अटी , नियम : काहीही नाहीत ,
कारण... तसलं काही ठेवून उपयोग नसतो , हा आजवरचा अनुभव . 

त्यांच्यासाठी १०१ गुन्हे माफ !

सर्व खेळात फिक्सिंग करणाऱ्यांना प्राधान्य !
लांडीलबाडी करता येणाऱ्यांना प्रथम प्रवेश !
विश्वासघात करता येणाऱ्यांना फुकट !

त्वरा करण्याची आवश्यकता नाही .

कारण आकाश, समुद्र , भुयारमार्गे ,

 कोठूनही, केव्हाही ते येऊ शकणारच आहेत !
त्या सहभागी कलाकारांनाच  खास सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल .
त्यांना सर्वप्रकारची शस्त्रे आणण्यची खास सवलत आहे.
कारण बंदी घालूनही ते छुप्या मार्गाने येऊ शकतात , 

हा अनुभव आपल्याला आहेच ! 
शिवाय ते ऐकणार नाहीत , याची खात्री आहे !

सर्व भारतीय प्रेक्षक आनंदाने स्पर्धा पहायला,

 उत्सुक असतील याची जाणीव आहे !
सर्व भारतीय प्रेक्षकांना सुरक्षेसाठी  -

भोकपडके शिरस्त्राण , जुनी चिलखते पुरवण्यात येतील , 
याची आवर्जून नोंद घ्यावी.

सर्व गर्भश्रीमंताना, दोन नंबरच्या श्रीमंताना इ. ना

 संयोजक, प्रायोजक इ. होण्यासाठी नम्र आवाहन !!!

खास स्पर्धकांसाठी:-
अत्याचार, गोंधळ, घातपात वगैरेंची व्यवस्था-

 त्यांची त्यांनी करण्यास पूर्ण मुभा आहे !

स्पर्धेची तारीख :- ३० फेब्रुवारी २०१३ 


.     .     .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा