सामान्यज्ञानाची ऐशी तैशी -



"सतारवादक भारतरत्न" पं. रविशंकरजींचे दु:खद निधन झाले,
त्या दिवशी सकाळी बसथांब्यावर माझ्या बाजूला,

 अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या  दोन सुकन्या  गप्पा मारत होत्या.

एक दुसरीला म्हणाली -
"सकाळपासून टीव्हीवर सारख्या त्याच त्या बातम्या दाखवत आहेत. कंटाळा आला यार ! "

दुसरी पहिलीला ठणकावून म्हणाली -

 " अग, ते लांब केसवाले शंकर आहेत ना- 
संतूर वाजवणारे, त्यांची बातमी दाखवत आहेत ! "

पहिली दुसरीला पुन्हा म्हणाली - 

" ते संतूर त्रिकोणी समोर ठेवलेलं असत, ते नाही ग ! 
ते दुसर उभं वाद्य असत ना .. ते वाजवणारे गेले. त्यांची माहिती दाखवत आहेत ! "

मित्र/मैत्रिणीनो, ही सत्य घटना आहे !

तात्पर्य काय ते समजून घ्या ..
नाहीतर कपाळावर हात बडवत बसा !


.     .     .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा