हेचि फल काय मम तपाला !


फार वर्षांपूर्वीची गोष्ट !

लग्नानंतरचे मौजमजेचे आमचे दोघांचे दिवस.
एकमेकांचे कोडकौतुक चाललेले....!

अशाच एका बेसावध क्षणी,
मी कौतुकाने बायकोला विचारले,
" काय ग,
मी कविता- कथा- नाटक- लेखन वगैरे करतो-
हे तुझ्या सर्व नातेवाईकांना,

 सांगितलेस की नाही अजून ? "

साधीभोळी, सरळ मनाची, 

काहीही आचपेच ठाऊक नसणारी,
निष्कपटी अशी बायको उत्तरली -

" छे छे ! मुळीच नाही !
तुम्ही फक्त क्लब मधे जाता आणि ड्रिंक्स घेता,
एवढेच सांगितलेय सगळ्यांना.
बाकीचं तसलं काही सांगण-
मला नाही बाई चांगलं वाटलं ! "


.     .     .

२ टिप्पण्या: