धंदा एके धंदा


दुपारच्या जेवणानंतर,
 वामकुक्षी घेता घेता स्वप्न पडले ....

"चार दिवस सासूचे" ही मालिका 'लवकर' संपवणारे निर्माते स्वप्नात आले.
 

नमस्कार चमत्कार झाल्यावर,
मी उत्सुकतेने विचारले -
" का हो, बरीच लवकर संपवली ती मालिका ? "

निर्मात्याने उलट विचारले - " लवकर म्हणजे ? "

मी उत्तरलो - " त्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्र्या    अजून  आजी-पणजीइतक्या   वयस्कर ,

अशा वाटत नाहीत !
शिवाय, 
ही मालिका पहाणाऱ्या बऱ्याच महिला अजून,
 आपली मान डुगडुगत असतानाही जिवंत आहेत, म्हणून विचारले ."

हुषार निर्माते  म्हणाले -
" त्यांच्यासाठीच ..... 

आम्ही  आता नवीन मालिका सुरू करतोय -
 "चार दिवस सुनेचे.... ",
 

साधारण बारा वर्ष चालेल ती .....!

.     .      .

२ टिप्पण्या: