'तुझे .. माझे ..'तुझे रुसणे 
माझे फसणे 

तुझे मागणे 
माझे पुरवणे 

तुझे बहाणे 
माझे घुटमळणे 

तुझे हसणे 
माझे धुसफुसणे 

तुझे रडणे 
माझे कासाविसणे 

तुझे असणे 
माझे अनमोल जगणे 

तुझे नसणे 
माझे कवडीमोल जिणे . .

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा