" बाळू - " (बालकविता)


आई म्हणते चिडून रागाने बाळूला,
"बाळू, तुझ्या खोड्या नाकी नऊ आणतात" -
बाळू विचारतो आईकडे पहात,
"तुझ्या नाकावर एकदोन कुठे दिसतात ?"

कामाच्यावेळी आई म्हणते बाळूला,
"कळतच नाही घड्याळ कसे पळते" -
घड्याळाकडे पहात बाळू म्हणतो,
"पळत नाही ते, आहे तिथेच दिसते !"

आई म्हणते बाळूला दुपारी जेवल्यावर,
"बाळू, जरा निवांत पडू दे ना मला" -
काळजीने बाळू म्हणतो आईला,
"आई, पडताना लागेल ना मग तुला !"
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा