फेसबुक-मित्रयादी-शोक

नको रे मना, "फ्रेंडरिक्वेस्ट" स्विकारू
स्वीकारता ती, नको बोंब मारू -
पुन्हपुन्हा "मित्रयादी"स पाहुन
कपाळावरी हात का घेशि मारुन ..

"प्रोफाईल" भाळुन उतावीळ होशी
"टाईमलाईन" का न आधी पहाशी -
आधी तपासून घे तू "प्रोफ़ाईल''
तुझा वेळ वाया कधी ना रे जाईल..

दिसेना कधी "पोस्ट" मित्राचि येथे
जमती टगे "ट्याग"वालेच तेथे -
"गेमा"स "पोका"स कंटाळशिल तू
या "फेबु"वर यायचे टाळशिल तू ..

नको रे मना गुंतु "यादी"मधे तू
हनूमानपुच्छा नको वाढवू तू -
हजारोनी जमतील "लिस्टी"त फ्रेंड
भलतेच असती अनेकांचे "ट्रेंड" ..!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा