अबोल माझ्या मना

"हातामध्ये हात धरूनी 
हळूच बोटे गुंफत बसणे ..

झटके लटके मानेला ते 
पदरालाही उगा झटकणे ..

डोळे मोठे करून हसणे 
डोळे बारिक करून रुसणे ..

मोहक असणे मोहक दिसणे 
मोहक बोलत हृदय जिंकणे ..

चाळवण्याला अंतच नाही 
साळसूदपण अंगी दिसणे -" ..

अबोल माझ्या मना,
सखीस आता झणी कळवणे ..

"किती पाहसी अंत सखे ग 
स्वप्नी येऊन पुरेच छळणे ..

आतुर झालो भेटायास्तव 
जिवास झाले असह्य कुढणे !" ..
.

२ टिप्पण्या: