प्रेम म्हणजे ...

नवरा-बायकोमधला 
रुसवा-फुगवा संपल्यानंतरची.....
लाडीगोडी -

मित्रा-मित्रामधल्या 
कडाक्याच्या भांडणानंतर झालेली.... 
दिलजमाई -

शेजाऱ्या-शेजाऱ्यामधल्या
हमरीतुमरीनंतर झालेले... 
चहापाणी -

दुकानदार-गिऱ्हाईकातल्या
हातघाईनंतर दिली घेतलेली ... 
चूकभूल -

मैत्रिणी-मैत्रिणी मधल्या 
धुसफुशीनंतर चॉकलेटसाठी 
एकमेकींच्या पर्समधली ... 
उचकाउचकी -

नेत्या-नेत्यांच्या 
आरोप-प्रत्यारोपानंतर रात्री जमलेली.... 
खास बैठक -

पोलीस-बकरा यांच्या 
धरपकडीनंतरचे ... 
गोड तोडपाणी -

प्रियकर-प्रेयसीमधल्या 
अबोल्यानंतर झालेली ... 
मुखशुद्धी -

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा