घर

स्वच्छता टापटीप असलेल

कागदाचा कपटा न पडलेल

खुर्च्या सोफासेट नीट ठेवलेल

खेळणी इतस्ततः न विखुरलेल

जागच्याजागी वस्तू असलेल

पाहुण्यांची वर्दळ नसलेल

नवरा-बायकोची चीडचीड नसलेल

ताई-दादाची गुद्दागुद्दी नसलेल

म्हाताऱ्या-कोताऱ्याची ख्वाक ख्वाक नसलेल ....

'घर ' तुम्ही कुठे पाहिलं आहे ?

......आणि जर तुम्ही पाहिल असेल......
तर -

मला तुम्ही समजावून सांगाल का,

त्याला "घर" कशासाठी म्हणायचे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा