तू

सखे,
तू माझी हायकू 
तू माझी चारोळी
तू माझी कविता...

तू माझा मुक्तछंद 
तू माझा ललित निबंध
तू माझा प्रबंध 
तू अनिर्बंध ...

तू अभंग 
तू अथांग 
तू अवर्णनीय 
तू अनाकलनीय ..

तू माझे पझल 
तू माझी गझल

बोल सखे बोल 
तू किती अनमोल
किती करू कौतुक ..

---- तरीही तू गप्पच !

कौतुक तुझे मी 
इतका वेळ केले- रग्गड !

काहीच कळले नाही म्हणतेस............?

कौतुक तुझे मी 
इतका वेळ केले- रग्गड !

काहीच कळले नाही म्हणतेस............?

मलाही जरा उशिराच कळले 

तू शुद्ध - एक दगड !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा