शेवटी माणूसच तो

उन्हात उभे राहून 
खंत करीत होते
वाळलेले झाड 
माणसासाठी ..

आपण यापुढे 
आधार होऊ 
नाही शकणार 
कुणालाही 
सावलीसाठी -

त्याच झाडाकडे
बघत बघत
मनातल्या मनात 
माणूस 
विचारात मग्न 
स्वार्थापोटी ...

चांगलच वाळलय
सावली ना फावली -
तोडायला आता 
काहीच हरकत नाही
सरपणासाठी . . !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा