असा मी असामी .. [गझल]

नतमस्तक मी योग्य ठिकाणी उद्धट असणारा मी नाही 
खटही होतो खटास बघुनी मुळुमुळु रडणारा मी नाही   


वाऱ्यासंगे तोंड फिरवतो जैशाला मी तैसा भिडतो   
संधी साधत निवडणुकीतुन मागे सरणारा मी नाही    


याचक दिसता गरजेपोटी मदतीला मी धावत जातो    
रणांगणावर नसता शस्त्र तेथे डरणारा मी नाही  


रचुनी कपटीकारस्थाने मोठा झालो इतका नामी  
असले जरि हे जग दो तोंडी मुकाट बसणारा मी नाही  


गंगेमधून पावन होतो गटारातही मी धडपडतो      
ठेवत राहो नावे कोणी फिकीर करणारा मी नाही ..  

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा