बोनस


काम करणाऱ्याला बोनस
 

काम बंद करणाऱ्याला बोनस
 

काम चुकवणाऱ्याला बोनस
 

संपावर जाणाऱ्याला बोनस
 

आळस करणाऱ्याला बोनस
 

कामावर झोप काढणाऱ्याला बोनस
 

कर्तव्य बजावणाऱ्याला बोनस
 

कामावरून पळ काढणाऱ्याला बोनस ..

सगळ्यांना द्या बोनसच बोनस - !


राबराबून
 

घाम गाळून
 

जिवापाड कष्ट करून
 

तुमच्याच पोटासाठी -

शेतात राबणाऱ्या
 

अन्न पिकवणाऱ्या
 

शेतकऱ्याच्या नशिबी मात्र ......


शेवटी
 

आत्महत्येचाच बोनस..... !!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा