चित्र हे विचित्र आहे -

फोर बीएचकेचा फ्ल्याट त्यांचा
चौघांना उपयोग चार दिशांचा

बायको दिसते मालिकेत दंग  
मुलगी असते गेम्समधे गुंग
  
नवरा फेस्बुकात डोके खुपसतो  
मुलगा कायम व्हाटसपात फसतो

धुण्याला बाई.. भांड्याला बाई
स्वैपाकाला बाई.. वाढायला बाई

कसलीच नसते कुणाला घाई
बसल्या रूममधे जेवण येई

प्रपंच असा चालू जोरात घरात
जो तो मग्न आहे आपल्या थेरात

कुणाचा कुणाला ना अडथळा
ज्यालात्याला आपल्या तंद्रीचा लळा

येणाऱ्या जाणाऱ्यांना माहित आहे
सगळेच "चित्र हे विचित्र आहे"

कुणी कुणाकडे जात-येत नाही
फ्ल्याटचे दार कधी उघडत नाही

"आपण सुखी.. तर जग हे सुखी"
- हल्लीची घोषणा ही सर्वामुखी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा