माझे विश्व तू श्री गुरुदत्ता..

शुभकार्यासी आरंभ करता
वंदन करतो श्री गुरुदत्ता..

गुंतवतो कार्यात मी हाता
मनात स्मरतो श्री गुरुदत्ता..

समाधान अति मनास होता
शांति लाभते माझ्या चित्ता..

मूर्ती नयनासमोर असता
नसते संसारी मज चिंता..

संकट येता तुज आळवता
पाठीशी तू माझा त्राता..

नामस्मरणी चित्त गुंतता
माझे विश्व तू श्री गुरुदत्ता..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा