घरोघरी -

शेवटी कंटाळून,
आईने स्वैपाकघरातून, 
इतका वेळ आपल्या हातात धरलेल्या
मोबाईलवरून मेसेज टाकून ,
पलीकडच्या खोलीतल्या लाडक्या लेकाला विचारलेच -

"पानं कधीची वाढून ठेवलीत, 
जेवायला येताय ना ?"

लेकानेही तिच्या त्या मेसेजला,
मेसेजनेच तत्परतेने उत्तर दिले -

"आलोच, अग पण थांब हं एक मिनिट ..
बाबा हॉलमधे बसले आहेत, 
किती वेळ लागणार आहे..
त्यांनाही मेसेज टाकून विचारतो !" 
.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा