पडली एकच ठिणगी दु:खाची --[गझल]

पडली एकच ठिणगी दु:खाची
काच तडकली पूर्ण जीवनाची

गेलो मुठीत मिठीतुन मी कधी
ना कळली ती बेडी जन्माची

ऊन संपता वाढला गारठा
का मज व्हावी जाणिव विरहाची

उरल्या जखमा प्रेम सोसता मी
बसलो मिरवत हौस दागिन्याची

धरता हाती सापहि ना डसला
डसली दुरून जात माणसाची ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा