जमेल ना तुला कधी ..[गझल]

जमेल ना तुला कधी चेहऱ्यास वाचणे
असेच चालणार हे मुखवट्यास बदलणे ..

विचार येत सारखे राहती तुझेच का
अशक्य मग मनातुनी पूर्वप्रेम विसरणे ..

तुझा ग चेहरा किती बोलतोय छानसा
दुधात शर्करा जणू त्यात सहज लाजणे ..

उगाच भाव बदलशी बघत आरशात तू
खुळावते तुझे असे आरशात पाहणे ..

उनाड मन असे कसे भरकटे तुझ्याकडे
पतंग ज्योत भेट का ना कधीच समजणे ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा