चार आले फार झाले - -[गझल]


चार आले फार झाले
शेवटी आधार झाले ..


पदासाठी पक्षबदलू
होउनी लाचार झाले .. 


लाटले भूखंड अगणित
अन भुईला भार झाले ..


ना कळे महिमा युतीचा
उलटसुलटे वार झाले ..


ना जमे अभिनय नराचा
वेष बदलुन नार झाले ..

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा