कोठे गेली दुरून बघुनी --[गझल]


वृत्त- त्रिलोकगामी 
लगावली- गागागागा लगालगागा 
मात्रा- १६ 
------------------------------------

कोठे गेली दुरून बघुनी
आशा जागी मनात करुनी ..
.
ओळख झाली इथे फुलांची
बघती टकमक खुशाल फुलुनी..
.
भिडला डोळा कसा अचानक
साद मिळाली तिचीहि हसुनी ..
.
बघवेना पण तिची निराशा
गजऱ्याविण ती उदास बसुनी ..
.
होते शोधत सख्यास डोळे
उरला हाती रुमाल भिजुनी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा