दोन विडंबने -

१.
[मूळ कवयित्रींची क्षमा मागून-]

असेन मी, नसेन मी- तरी दिसेल कचरा हा 
उकीरड्यावरी इथे, उद्या असेल कचरा हा !

कचरा हौदाभोवती वास कुंद दाटले
साफसफाई नसे, माशा डास साठले 
हौद हा किती लहान, कसा बसेल कचरा हा ?

झोपे महापालिका- न कर्मचारी जागे ते 
झाडू घेऊन स्वत: कोण सर्व झाडते ?
स्वच्छता असे जिथे, तिथे घुसेल कचरा हा ..

कुणास ना ठाऊके, कुठे कसे पुसायचे ?
तक्रार-विनंती-अर्ज ते कचऱ्यातच जायचे 
निवडणूक सरली तरी, मनी वसेल कचरा हा !
.

२.
सासूचे किटले कान, होतसे बहिरी 
कानात बसती दडे, सून किरकिरी !

अशी कुठे लागते डुलकी, क्षणभरी भासे 
कुठे आत वाजते भांडे, धडकी भरतसे ..

किती कानी घालते बोळे, आत आवाज 
उपयोग होई ना काही- सून तरबेज ..

किती करी सासू, विनवणी आर्जवे तीस 
अंगी ना उरले त्राण, सोसे सुनवास !
.

["भन्नाट "- दिवाळी अंक २००९]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा