भीती कविता श्रवणाची -

कवितेचे घेऊन बाड मी 
भटकत गेलो कुठेतरी मी..

घडले आश्चर्य सांगतो मी
वाघ बघोनी घाबरलो मी..

ऐकत डरकाळी त्याची मी 
मनी ठरवली युक्ती नामी..

ठोकत आरोळी वदलो मी -
"ऐकवतो आता कविता मी !"

- सुनावता त्यालाच असे मी 
युक्ती माझी आली कामी..

कवितेपासून पळती नेहमी 
दूर स्वत: म्हणणारे मी मी-

शेपुट घालुनी जंगलस्वामी
गेला खाली, पाहिलेच मी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा