दु:ख पर्वताएवढे -

सुख होते उभे माझ्या दारात 
विचारत मला- "येऊ का घरात ?"

निवांतपणे म्हटले आतूनच मी -
"ये, स्वागतास तुझ्या सज्ज मी !"

दारातूनच सुख थोडे डोकावले
आणिक सर्वत्र त्याने न्याहाळले

सगळीकडे दु:ख पसरले होते 
सुखाने डोळे विस्फारले होते

नजर जाईल त्याची जिकडे तिकडे 
दु:खच दिसले त्यास चोहोकडे

पाय इंचभरही टेकण्यापुरती 
आत जागा कुठे उरली नव्हती

.. सुख निराश होत हळहळले 
खाली मान घालत ओशाळले

मन त्याचे अती गहिवरले 
बिच्चारे आल्या पावली निघून गेले !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा