संसाराच्या खेळामधली --

[चाल- भातुकलीच्या खेळामधली --]

संसाराच्या खेळामधली राजा आणिक राणी 
भांडी घासतो राजा आणत अपुल्या डोळा पाणी ..

राजा वदला मला समजली का ही मिळाली शिक्षा 
उगाच मागितली होती मी तिला प्रेमाची भिक्षा 
ना राणीच्या डोळा अजुनी कधीच दिसले पाणी ..

राणी बघते त्यास एकटक अन त्याचा तो पसारा 
रोज पहाटे करते कटकट दिसभर गोंधळ सारा 
पण राजाला कधी न कळली मुखवट्यातली राणी ..

मनी बिचारा कुढतो राजा का मी प्रेम करावे 
माझ्या नशिबी लग्नानंतर केरवारे हे यावे 
या प्रेमाचे उत्तर असते हालत ही जीवघेणी ..

का राणीने मिटले डोळे छान हे आठवताना
का राजाचा बीपी वाढला प्रेम तिचे स्मरताना 
कानावर ती उडतच आली राजाची रडगाणी ..
.

1 टिप्पणी: