विठ्ठल विठ्ठल - -

उपास तापास नाही मी करत 
विठ्ठल विठ्ठल भजन मी करता ..

नवस सायास नाही मी बोलत 
विठ्ठल विठ्ठल स्मरण मी होता ..

वार बीर कोणता नाही मी मानत 
विठ्ठल विठ्ठल मनात मी जपता ..

दान बीन कुणाला नाही मी घालत 
विठ्ठल विठ्ठल घरात मी म्हणता ..

कीर्तन बिर्तन नाही मी ऐकत 
विठ्ठल विठ्ठल मुखाने मी बोलता ..

पुण्य बिण्य काही नाही मी जाणत 
विठ्ठल विठ्ठल तालात मी म्हणता ..

देहभान माझे जातो मी विसरत 
विठ्ठल विठ्ठल एकरूप मी होता .. !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा