माळेमधुनी राव फटाके - - - [गझल]

मात्रावृत्त
मात्रा - १६ +१६ 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
माळेमधुनी राव फटाके जोशामध्ये फोडत होता 
नजरेतूनच रंक फटाके काही फुसके शोधत होता..
.
गेली उमलत हळू सख्याची मनात माझ्या एक आठवण 
शेजारी तो छान मोगरा सुवास हळूच पसरत होता..
.
निळ्या नभातुन सोबत माझ्या सुंदर सखीस बघता बघता 
ढगात जागा चंद्र लपाया शोधत शोधत खवळत होता..
.
भान विसरला रंगत चढता लोकांना ती हसवण्यामधे 
पैशासाठी दु:ख आपले मुखवट्यात तो लपवत होता..
.
साधत होते दु:ख किती ते संगत त्याची आपुलकीने 
स्वप्नामध्ये दिसताही सुख असा कसा तो दचकत होता.. 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा