चत्कोर भाकरीचा - [गझल]

चत्कोर भाकरीचा तुकडा शिळा मिळाला
जग हे मुठीत आले आनंद त्यास झाला..
.
कुरवाळते टफीला प्रेमे विशाल महिला   
हकलून त्या भुकेल्या दारात याचकाला.. 
.
का मंदिरात घुसती बेशिस्त माणसे ती    
धरुनी उभे भिकारी शिस्तीत वाडग्याला.. 
.
घेतो निजेस धोंडा खातो भुकेस कोंडा
मिरवीत तो भिकारी थाळीसही निघाला..
.
पैशात लोळतो पण चिंतेत रोज जळतो 
तो लोभ 'आणखी'चा जगण्यात भार आला..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा